28 आॉक्टोबर रोजी होणार्या शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आव्हान बच्चूभाऊ कडू यांनी माळेगांव बाजार येथील शेतकारी हक्क सभेमध्ये केले. सभेला पंचक्रोशीतील हजारो शेतकरी उपस्थित होते. सोयाबीनला हमीभाव न मिळाल्यास जिलाधिकारी कार्यालयत सोयाबिनचे कुटार भरण्याचा इशारा शासनाला देण्यात आला या वेळी बच्चूभाऊ कडू यांची साध्वी चंफा माता मंदिराजवळून बैल बंडीत भव्य मिरवणूक काढण्यात आली ठिक ठिकाणी औक्षण करूण व जेसिबीद्वारे पुष्पव्रुष्ठी करून जंगी स्वागत शेतकर्यांकडून करण्यात आले.
