लोणावळा – पारंपरिक उत्साह आणि सांस्कृतिक रंगत जपणाऱ्या शिवसेना महिला आघाडी लोणावळा शहर यांच्या वतीने कुमार रिसॉर्ट येथे मंगळा गौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला लोणावळा शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहवर्धक रंगत आणली.
महिलांसाठी खास आकर्षण
कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला. पारंपरिक गाणी, खेळ आणि मंगळागौरिच्या फुगड्या यामुळे वातावरण अगदी उत्साहपूर्ण झाले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, शहर समन्वयक नंदूभाऊ कडू, युवासेना शहराध्यक्ष विवेक भांगरे, सल्लागार पराग राणे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष पांडुरंग तिखे, विभाग प्रमुख प्रसाद कन्नन, उपविभाग प्रमुख परेश वावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला आघाडीचे आयोजन कौतुकास्पद
या भव्य सोहळ्याचे आयोजन महिला आघाडी मावळ तालुका समन्वयक मा. नगरसेविका कल्पना आखाडे, उपतालुका संघटिका मा. नगरसेविका सिंधू परदेशी, महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे, उपशहर संघटिका प्रिया पवार, उपशहर संघटिका अनिता गायकवाड आणि दीपाली शिरंबेकर यांनी केले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा सोहळा यशस्वी झाला.
सुत्रसंचालनाची जबाबदारी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा तांदळे यांनी उत्साहपूर्ण पद्धतीने करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सांस्कृतिक वारसा जपणारा उपक्रम
पारंपरिक मंगळा गौर साजरी करून महिलांना एकत्र आणणारा हा उपक्रम म्हणजे सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याचा आदर्श प्रयत्न असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. “लोणावळ्यात शिवसेना महिला आघाडीच्या मंगळा गौर सोहळ्यात महिलांचा उत्साह उसळला!”