Home Breaking News मुंब्रा पावसाने झोडपले – हवामान खात्याचा इशारा, स्थानिक पातळीवर मदतकार्य सुरु

मुंब्रा पावसाने झोडपले – हवामान खात्याचा इशारा, स्थानिक पातळीवर मदतकार्य सुरु

38
0
मुंब्रा – राज्यभर पावसाचा जोर सतत वाढत असून, हवामान खात्याने पुढील २-३ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर आज माझ्या सहकाऱ्यांसमवेत मुंब्र्यात विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तातडीने गरजूंना मदत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.
स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी रस्त्यांवरील पाणी साचणे, घरात पाणी शिरणे, वाहतुकीतील अडथळे याबाबत चिंता व्यक्त केली. यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. पावसात घराबाहेर अनावश्यकपणे न पडणे, विजेच्या तारा, झाडांच्या फांद्या यापासून दूर राहणे, तसेच सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे यासंदर्भातही नागरिकांना आवाहन करण्यात आले.
पावसाळी संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक यांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. मुंब्र्यातील काही भागात मदतसामग्री पोहोचवण्यात आली असून, आणीबाणीच्या प्रसंगी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच प्रशासनावर विश्वास ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याने आपत्कालीन पथक सतत सज्ज ठेवण्यात आले आहे.
“मुंब्रा पावसाने झोडपले! हवामान खात्याचा इशारा, गरजूंना तातडीची मदत व काळजी घेण्याचे आवाहन”