J Ramdas
शून्य कचरा प्रकल्पातील उल्लेखनीय कार्या बद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटास ‘नॅशनल...
शून्य कचरा प्रकल्पातील उल्लेखनीय कार्या बद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटास 'नॅशनल प्राईड ऑफ इंडिया' पुरस्कार.
पिंपरी, दि. २७ जुलै २०२७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य...
महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण.
महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण.
शहराच्या भविष्यातील विकासाला पूरक नियोजनावर भर..
पिंपरी, दि. २७ जुलै :- "पिंपरी चिंचवडच्या विकासाचा वेग लक्षात घेता मेट्रोचे नियोजन केवळ आजच्या गरजांसाठी नव्हे, तर पुढील अनेक दशकांचा विचार करून करण्यात यावे. नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात," असे निर्देश महापौर रवि लांडगे यांनी महामेट्रोला दिले.
महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे,महेश लांडगे,शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टीचे खुणाल वाव्हळकर, शहर अभियंता मनोज सेठीया, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महामेट्रो आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय प्रणालीद्वारे प्रस्तावित मेट्रो विस्ताराचे सादरीकरण केले. महामेट्रोकडून मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादर करण्यात आला. प्रस्तावित मार्ग, त्यांची व्यवहार्यता, प्रवासी क्षमता, भविष्यातील विस्तार, विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी समन्वय तसेच शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी शहरातील नव्याने विकसित होत असलेले निवासी परिसर, औद्योगिक वसाहती, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, व्यापारी केंद्रे तसेच प्रमुख वाहतूक मार्गांना मेट्रो नेटवर्कशी प्रभावीपणे जोडण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि शहराच्या विस्तारणाऱ्या सीमांचा विचार करून डीपीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत मान्यवरांकडून सूचना करण्यात आल्या.
मेट्रो स्थानकांपर्यंत नागरिकांना सहज पोहोचता यावे, यासाठी बस सेवा, पार्किंग, मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' यांचा प्रभावी समावेश असावा, अशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली. तसेच मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यास, औद्योगिक आणि आयटी क्षेत्राच्या वाढीस चालना मिळण्यास तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सुलभता निर्माण होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, "पिंपरी चिंचवड हे देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. आगामी काळातील लोकसंख्या, औद्योगिक आणि आयटी क्षेत्राचा विस्तार तसेच नागरिकांच्या वाढत्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो प्रकल्पाचे नियोजन करण्यात यावे. आजच्या गरजांसोबतच पुढील अनेक दशकांचा विचार करून तयार होणारे मेट्रो नेटवर्क शहराच्या विकासाला नवी दिशा देईल. त्यामुळे डीपीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारावा."
रक्षा मंत्री राजनाथ सिंह के ‘पाकिस्तान के साथ बातचीत केवल पीओके...
रक्षा मंत्री राजनाथ सिंह के 'पाकिस्तान के साथ बातचीत केवल पीओके पर होगी' कमेंट पर इस्लामाबाद में हलचल देखी गई है। पाकिस्तानी सरकार ने...
अली और जन्नत बने ‘लाफ्टर शेफ्स 3’ के विनर, सबसे अधिक...
अली और जन्नत बने 'लाफ्टर शेफ्स 3' के विनर, सबसे अधिक स्टार्स लेकर भी पिछड़े तेजस्वी-अर्जुन, करण की किस्मत खोटी!
अली गोनी और जन्नत जुबैर...
BKC से वेस्टर्न एक्सप्रेस तक सिग्नल फ्री सफर, ट्रैफिक के लिए...
BKC से वेस्टर्न एक्सप्रेस तक सिग्नल फ्री सफर, ट्रैफिक के लिए जल्द खुलेगा नया एलिवेटेड कॉरिडोर
लंबे समय से अटके सांताक्रूज-चेम्बूर लिंक रोड एक्सटेंशन का...
गर्म रातों ने उड़ाई दुनिया की नींद, हर साल 56 घंटे...
गर्म रातों ने उड़ाई दुनिया की नींद, हर साल 56 घंटे कम सो पा रहे लोग; भारत पर सबसे ज्यादा असर
क्लाइमेट सेंट्रल की रिपोर्ट...
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बाद छत्तीसगढ़, पंजाब और...
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बाद छत्तीसगढ़, पंजाब और ओडिशा में शिक्षा मंत्रियों के इस्तीफे की मांग तेज हो गई है।
नई दिल्ली।...
पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; नंदन निलेकणींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क...
पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; नंदन निलेकणींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन.
नवी दिल्ली:२६जुलै :देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांच्या...
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने थार चोरी; CCTV च्या मदतीने अट्टल आरोपी सोलापुरातून...
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने थार चोरी; CCTV च्या मदतीने अट्टल आरोपी सोलापुरातून जेरबंद.
सातारा: २६ जुलै ; सातारा शहरातील महिंद्रा शोरूममधून टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने महिंद्रा थार...
72 तास मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
72 तास मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
मुंबई :२६ जुलै: महाराष्ट्रात जुलैअखेर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून पुढील 72 तास...