Home Breaking News पार्थ पवारांची सही असलेला ‘तो’ महत्वाचा दस्तावेज! सुषमा अंधारेंनी दिला ठोस पुरावा

पार्थ पवारांची सही असलेला ‘तो’ महत्वाचा दस्तावेज! सुषमा अंधारेंनी दिला ठोस पुरावा

49
0
अमेडिया कंपनीकडून तब्बल १८०० कोटींच्या बाजारमूल्याची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी केल्याच्या प्रकरणाने राज्यात खळबळ माजली आहे. या व्यवहाराचे काही महत्वाचे कागदपत्रे समोर येत असून, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आता पार्थ पवार यांची सही असलेला पुरावा सार्वजनिक केला आहे.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर या जमिन व्यवहाराशी संबंधित एक कागदपत्र शेअर केले असून, त्यावर पार्थ पवार यांची स्पष्ट सही असल्याचे दिसून येते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की —

“पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मुंद्रांक विभाग आणि पोलिस प्रयत्न करत आहेत का? एकच दस्त ९०१८/२२५ नोंदणीत वापरला असताना, आणि जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही असूनही, चौकशी अहवालात त्यांचं नाव टाळलं का?”

याशिवाय अंधारे यांनी असेही नमूद केले की, अमेडा कंपनीत पार्थ पवार यांचा ९९ टक्के आणि दिग्वीजय यांचा फक्त १ टक्का हिस्सा आहे, तरीदेखील गुन्हा मात्र दिग्वीजय पवार यांच्यावर दाखल करण्यात आला आहे, हेच संशय निर्माण करणारे आहे. या खुलास्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, या प्रकरणात पुढील चौकशी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.