Home Breaking News “कोल्ड्रिफ” कफ सिरपमुळे अनेक निष्पाप बालकांचा मृत्यू!

“कोल्ड्रिफ” कफ सिरपमुळे अनेक निष्पाप बालकांचा मृत्यू!

73
0
देशभरात आरोग्य व्यवस्थेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. झेरयुक्त कफ सिरप “कोल्ड्रिफ” च्या सेवनानंतर अनेक निरागस बालकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. औषध घेतल्यानंतर मुलांना उलट्या, ताप आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती मिळत आहे.
आरोग्य विभागाने तत्काळ या औषधाच्या नमुन्यांची तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक तपासणीत या सिरपमध्ये हानिकारक रासायनिक घटक असल्याचं स्पष्ट झालं आहे. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, सर्वत्र या औषधाचं विक्री वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, बाजारात विकल्या जाणाऱ्या सर्व औषधांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू आहे. पालकांना सल्ला देण्यात आला आहे की, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या मुलांना देऊ नये.
ही घटना केवळ एक अपघात नाही तर औषध उद्योगातील निष्काळजीपणाचं भयावह उदाहरण ठरली आहे. आता संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणातील दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे.