Home Breaking News “तेजस्वी यादवांना निवडणूक लढवायची हिंमत नाही” – अमित शाहांचा बेगूसरायमध्ये जोरदार हल्ला,...

“तेजस्वी यादवांना निवडणूक लढवायची हिंमत नाही” – अमित शाहांचा बेगूसरायमध्ये जोरदार हल्ला, NDA ला प्रचंड बहुमत येणार विश्वास

62
0
बेगूसराय (बिहार) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बेगूसराय येथील प्रचार सभेत राष्ट्रीय जनता दल (RJD) चे नेते तेजस्वी यादव यांच्यावर तीव्र हल्ला चढवला. शाह म्हणाले, “तेजस्वी यादवांना निवडणूक लढवायची हिंमत नाही. जनतेच्या न्यायालयात उतरायला त्यांच्याकडे धैर्य नाही. बिहारची जनता विकासाच्या प्रश्नांवर मतदान करणार असून NDA ला यावेळी प्रचंड बहुमत मिळणार आहे.”
या सभेत अमित शाह यांनी मंचावरून खासकरून गिरिराज सिंह यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून घेतली. उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. शाह यांनी NDA सरकारच्या विकासकामांचा उल्लेख करताना पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, युवकांसाठी रोजगार आणि गरीबांच्या कल्याणासाठी राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला.
तेजस्वी यादव आणि विरोधकांवर टीका करताना शाह म्हणाले की, “ज्यांना केवळ कुटुंबवादाची आणि भ्रष्टाचाराची राजकारण करायची सवय आहे, त्यांना जनता कधीच स्वीकारणार नाही. NDA च्या एकजुटीसमोर विरोधक टिकणार नाहीत.”
शाह यांच्या या भाषणामुळे बेगूसरायमधील राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. NDA कार्यकर्त्यांचा दावा आहे की, या सभेनंतर मतदारांमध्ये आणखी एकजुट निर्माण होईल.