Home Breaking News मुलुंडमध्ये गतिशक्ती मल्टीमॉडल्स कार्गो टर्मिनल

मुलुंडमध्ये गतिशक्ती मल्टीमॉडल्स कार्गो टर्मिनल

17
0

मुलुंडमध्ये गतिशक्ती मल्टीमॉडल्स कार्गो टर्मिनलमुलुंडमध्ये उभारणार गतिशक्ती मल्टीमॉडल्स कार्गो टर्मिनल, ३५ वर्षांचा करार, १८ महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

Gati Shakti Multi Modal Cargo Terminal In Mulund: मध्य रेल्वेने एक मोठा प्लॅन आखला आहे. मध्य रेल्वे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी मुलुंडमध्ये गतिशक्ती मल्टीमॉडल्स कार्गो टर्मिनल विकसित करण्याची जोरदार तयारी करत आहे. हे टर्मिनल पूर्णपणे रेल्वेच्या जमिनीवर उभारले जाईल.

मध्य रेल्वेने मालवाहतूक वाढवण्यासाठी मुलुंडमध्ये गतिशक्ती मल्टीमॉडल्स कार्गो टर्मिनलविकसित करण्याची तयारी चालवली आहे. हे टर्मिनल पूर्णपणे रेल्वेच्या जमिनीवर बनवले जाईल. याच्या विकासासाठी आणि संचालनासाठी कंत्राटदारासोबत ३५ वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाद्वारे रेल्वेच्या मालवाहतुकीसाठी आवश्यक असलेले पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) विकसित करता येईल.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनुसार, रेल्वेमार्फत मालवाहतूक केल्यामुळे रस्ते वाहतुकीवर असणारी मदार कमी होईल. यामुळे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचा एकूण खर्चही कमी होऊ शकतो.