Home Breaking News यशच्या रावण लूकवर आर्या बब्बरची टीका; ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानला ठरवले सरस

यशच्या रावण लूकवर आर्या बब्बरची टीका; ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानला ठरवले सरस

34
0

यशच्या रावण लूकवर आर्या बब्बरची टीका; ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानला ठरवले सरस
नवी दिल्ली: नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण पार्ट १’ या चित्रपटात अभिनेता यश लंकापती रावणची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

मात्र, अभिनेता आणि राज बब्बर यांचा मुलगा आर्या बब्बर याला यशच्या या लूकध्ये काहीही नवीन वाटलेले नाही.
आर्या बब्बरने ‘आदिपुरुष’ चित्रपटातील सैफ अली खानच्या रावण या पात्राचे कौतुक केले. सैफने आपल्या अभिनयामुळे या पात्रात एक वेगळीच तीव्रता (इंटेंसिटी) आणली होती, असे त्याने म्हटले. त्याच्या मते, कलाकाराचा लूक आणि कामगिरी यात दिग्दर्शकाचीही महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे यासाठी थेट अभिनेत्याला दोष देता येणार नाही.
दुसरीकडे, यशच्या लूकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आर्या म्हणाला की, वेशभूषेशिवाय (कॉस्ट्यूम) यामध्ये काहीही नवीन दिसत नाही. त्याची दाढीसुद्धा त्याला ‘केजीएफ’ चित्रपटासारखीच वाटली. मात्र, त्याने अशी आशा व्यक्त केली की, चित्रपटात यशचा अभिनय जबरदस्त असेल आणि प्रेक्षकांना त्याचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळेल.
या चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीताच्या भूमिकेत, रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.