‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र पोलीस आंदोलकांचे छळवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर प्रस्तावित असलेल्या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना दीपके यांनी इशारा दिला आहे की, जर आंदोलकांना रोखले गेले किंवा त्यांना अटक केली गेली, तर ‘पूरा देश जंतर-मंतर बनेगा’.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. अटकेची भीती व्यक्त करतानाच दीपके यांनी स्पष्ट केले की, त्यांना अटक झाली तरीही हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही