Home Breaking News प्रवासी ऑटोरिक्षातून मालवाहतूक केल्यास कारवाई; पुणे RTOचा चालकांना इशारा.

प्रवासी ऑटोरिक्षातून मालवाहतूक केल्यास कारवाई; पुणे RTOचा चालकांना इशारा.

44
0

प्रवासी ऑटोरिक्षातून मालवाहतूक केल्यास कारवाई; पुणे RTOचा चालकांना इशारा.

पुणे : २३ सप्टेंबर २०२६

पुणे शहरात काही प्रवासी ऑटोरिक्षा तसेच इतर प्रवासी वाहनांमधून नियमबाह्य पद्धतीने मालवाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे RTOने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांसह इतर वाहनधारकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

प्रवासी वाहतुकीसाठी परवाना असलेल्या वाहनातून मालवाहतूक करण्यास परवानगी नाही. अशा वाहनातून मालवाहतूक करताना वाहन आढळून आल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी २ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

ऑटोरिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचे वैयक्तिक सामान (Luggage) सोबत नेण्याची परवानगी आहे. मात्र, प्रवाशांच्या वैयक्तिक सामानाव्यतिरिक्त इतर मालाची वाहतूक करण्यास परवानगी नाही. तसेच, प्रवासी ऑटोरिक्षाचा मालवाहतूक वाहन म्हणून व्यावसायिक वापर करता येणार नाही.

पुणे शहरातील सर्व ऑटोरिक्षा चालक तसेच इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, असे RTOने स्पष्ट केले आहे. परवानगी नसताना प्रवासी वाहनातून मालवाहतूक करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा व नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे.