Home Breaking News सासवड पोलिसांनी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला केले अटक.

सासवड पोलिसांनी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला केले अटक.

55
0

सासवड पोलिसांनी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला केले अटक.

सासवड: सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने चंंदन टेकडी परिसरात कारवाई करत बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

दिनांक १६/०९/२०२६ रोजी चंदन टेकडी जवळ संशयास्पदरीत्या आढळलेला आरोपी शुभम सतीश कामथे (वय २५ वर्ष, रा. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्याकडून ₹३५,०००/- किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि ₹७,०००,०००/- किमतीची काळ्या रंगाची Maruti Fronx कार, असा एकूण ₹७,३५,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सासवड पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र अधिनियम (कलम ३, २५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीपसिंह गिल, अधीक्षक बारामती विभाग गणेश  बिरादार ,मा.अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग सासवड राजेंद्र सिंह गौर पोलीस निरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन संतोष घोळवे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.