Home Breaking News लोणी काळभोरमध्ये ACBची धडक कारवाई; API कृष्णा बाबर लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

लोणी काळभोरमध्ये ACBची धडक कारवाई; API कृष्णा बाबर लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

31
0

लोणी काळभोरमध्ये ACBची धडक कारवाई; API कृष्णा बाबर लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

लोणी काळभोर | पुणे ९ सप्टेंबर.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कृष्णा बाबर यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका दाखल गुन्ह्यातील आरोपीचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्यासाठी API कृष्णा बाबर यांनी आरोपीच्या नातेवाईकांकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी गेला असता API कृष्णा बाबर यांनी लाचेची रक्कम स्वीकारली, त्याचवेळी ACB पथकाने कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले.

या कारवाईमुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.