Home Breaking News संतोष पंडित पोलिसांच्या ताब्यात; चंद्रकांत पाटलांविरोधातील वक्तव्याप्रकरणी कारवाई

संतोष पंडित पोलिसांच्या ताब्यात; चंद्रकांत पाटलांविरोधातील वक्तव्याप्रकरणी कारवाई

22
0

संतोष पंडित पोलिसांच्या ताब्यात; चंद्रकांत पाटलांविरोधातील वक्तव्याप्रकरणी कारवाई.

पुणे | ३ सप्टेंबर २०२६ :

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले रीलस्टार संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी रात्री उशिरा त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह व अश्लील भाषेचा वापर केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात संतोष पंडित यांच्यासह अन्य दोघांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत संतोष पंडित यांना ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. संतोष पंडित यांच्या वक्तव्यावरून राजकीय तसेच सोशल मीडिया वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. प्रकरणातील आरोप आणि पोलिस तपासातून पुढे येणाऱ्या अधिकृत माहितीनंतर या कारवाईचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.