केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज,८वा वेतन आयोग: १८ हजारांचा बेसिक थेट ७२ हजारांवर.
नवी दिल्ली | २ सप्टेंबर २०२६
आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींकडे देशभरातील सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः फिटमेंट फॅक्टर किती असणार, यावर नवीन वेतन किती वाढणार हे ठरणार आहे.
केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून ३.६१ ते ४.०० फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगात २.७५ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानंतर किमान बेसिक वेतन ७ हजारांवरून १८ हजार रुपये झाले होते.
४.०० फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास सध्याचा १८ हजार रुपयांचा किमान बेसिक पगार थेट ७२ हजार रुपये होऊ शकतो. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) ४.०० फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे.
दरम्यान, ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणीही करण्यात आली असून, त्यानुसार किमान बेसिक वेतन सुमारे ६९ हजार रुपये होऊ शकते. तर ३.६१ फिटमेंट फॅक्टरनुसार हा आकडा सुमारे ६४ हजार रुपये होईल.
मात्र, ८व्या वेतन आयोगाने अद्याप अंतिम फिटमेंट फॅक्टर निश्चित केलेला नाही. त्यामुळे ७२ हजार रुपये हा सध्या कर्मचारी संघटनेच्या मागणीवर आधारित संभाव्य आकडा आहे; अंतिम वेतनवाढ सरकारच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

