Home Breaking News आई एकवीरेच्या पायथ्याशी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका; १५ जण ताब्यात, १२.४१ लाखांचा...

आई एकवीरेच्या पायथ्याशी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका; १५ जण ताब्यात, १२.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त!

51
0

आई एकवीरेच्या पायथ्याशी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका; १५ जण ताब्यात, १२.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोणावळा :  28 ऑगस्ट ; आई एकवीरा देवीच्या पायथ्याशी सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, तब्बल १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
कारवाईदरम्यान १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच रोख रक्कम व इतर मिळून १२.४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

लोणावळा परिसरातील अवैध जुगाराच्या प्रकारांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जुगार अड्डा चालकांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.