शिरूरमध्ये एमडी अमली पदार्थांवर पोलिसां चा मोठा प्रहार; 56 ग्रॅम एमडीसह दोघे जेरबंद.
शिरूर : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. 26 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे न्हावरा-तळेगाव रोड परिसरात छापा टाकून 56 ग्रॅम वजनाचे प्रतिबंधित एमडी (अॅम्फेटामाईन) अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत प्रदीप विठ्ठल कोरेकर आणि साईनाथ जनार्दन भोसले (वय 35, रा. कारेगाव, ता. शिरूर) यांना ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 11 लाख 90 हजार रुपये असून, त्यात एमडी पदार्थ, मोटारसायकल व दोन मोबाईल फोनचा समावेश आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 769/2026 अन्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्र आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, तसेच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.
या कारवाईसोबतच पोलिसांनी 18 ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत सुरेंद्रसिंह भैरूसिंह राठोड ऊर्फ राजपूत व श्रवण तेजाराम बिष्णोई यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 110 ग्रॅम एमडी व मोटारसायकल असा 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच 19 ऑगस्ट रोजी दादा बबन धावडे व अमोल राजाराम पोतावळे यांना ताब्यात घेऊन 20 ग्रॅम एमडी व स्कॉर्पिओ कार असा 9 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या संपूर्ण कारवाईत सपोनि प्रशांत दिवटे, पोउनि महेश डोंगरे, पोउनि सागर शेळके, पोलीस अंमलदार संजय पडवळ, पो.हवा. तुषार पंदारे, पो.हवा. जनार्दन शेळके, पो.हवा. संजू जाधव, पो.हवा. राजू मोमीन, पो.हवा. विकास पाटील, पो.शि. सागर धुमाळ तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बाळू भवर, गिराम व चितारे यांनी सहभाग घेतला.
पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांची विक्री वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. नागरि कांनी आपल्या परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा वाहतू क होत असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
