Home Breaking News व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाला पुणे ग्रामीण पोलीस दलाचा पुढाकार.

व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाला पुणे ग्रामीण पोलीस दलाचा पुढाकार.

52
0

व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाला पुणे ग्रामीण पोलीस दलाचा पुढाकार.

पुणे : १०ऑगस्ट :पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) श्री. रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली “अंमली पदार्थांना ‘नो’ म्हणण्याचे धाडस” या संकल्पनेवर आधारित व्यसनमुक्ती जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे.

व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीचे आरोग्य, कुटुंब व समाजावर होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने व्यसनमुक्ती, समुपदेशन आणि पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांना (NGOs) एकत्र आणून हे अभियान सुरू केले आहे.

मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये व उद्दिष्टे:

 * नवीन व्यवसायांचे प्रशिक्षण: अवैध दारू व अमली पदार्थांच्या व्यवसायात वारंवार गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींना त्या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

 * शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती: १५ ऑगस्टपर्यंत कोल्हापूर परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ड्रग्ज, सायबर क्राइम, वाहतूक सुरक्षा आणि महिला सुरक्षेशी संबंधित जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

 * समुपदेशन व पुनर्वसन: व्यसनाधीन व्यक्तींना शिक्षा देण्याऐवजी समुपदेशन आणि उपचारांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जाईल.

 * “व्यसनाला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार”: या संदेशाद्वारे समाज, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, तसेच विविध सामाजिक संस्था व व्यसनमुक्ती केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.