Home Breaking News 72 तास मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

72 तास मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

45
0

72 तास मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.

 

मुंबई :२६ जुलै: महाराष्ट्रात जुलैअखेर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून पुढील 72 तास राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी 22 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यापैकी रायगड, रत्नागिरी तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित 18 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्गमध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने नागरिकांना नदीकाठ, सखल भाग आणि घाट परिसरात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, विजांच्या कडकडाटादरम्यान सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.