Home Breaking News पुणे ग्रामीण पोलिस आणि राजगड पोलीस ठाण्याच्या हाद्दीत जुन्या कात्रज बोगद्या जवळील...

पुणे ग्रामीण पोलिस आणि राजगड पोलीस ठाण्याच्या हाद्दीत जुन्या कात्रज बोगद्या जवळील खून प्रकरण उघड; चार आरोपींना अटक, गावठी पिस्तूल जप्त.

29
0

पुणे ग्रामीण पोलिस आणि राजगड पोलीस ठाण्याच्या हाद्दीत जुन्या कात्रज बोगद्या जवळील खून प्रकरण उघड; चार आरोपींना अटक, गावठी पिस्तूल जप्त.

भोर, ता. 20 जुलै : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि राजगड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत शिंदेवाडी (ता. भोर) येथील जुन्या कात्रज बोगद्याजवळ झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावण्यात आला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

14 जुलै 2026 रोजी रात्री शिंदेवाडी परिसरातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ संजय बाबूराव कडू-देशमुख (वय 40) यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

तपासात मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी, मिझान ग्यासुद्दीन शेख आणि संदीप बाबुलाल कोरी यांनी मिळून हा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या चौकशीत मंथन वैद्य याच्या वडिलांच्या खुनाचा जुना वाद असल्याने सूडाच्या भावनेतून ही हत्या केल्याची माहिती समोर आली.

आरोपी संदीप बाबुलाल कोरी याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.