Home Breaking News रेड अलर्टचा इशारा; पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

रेड अलर्टचा इशारा; पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

25
0

रेड अलर्टचा इशारा; पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

पुणे: ६ जुलै ;भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ६ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करून मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार, पुणे शहर व ग्रामीण भागातील सर्व अंगणवाड्या तसेच सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आज बंद राहतील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियमित वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले, धबधबे आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्याजवळ न जाण्याचे तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.