Home Breaking News मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना संधीची शक्यता, गडकरी-शाह यांच्या भूमिकेत...

मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना संधीची शक्यता, गडकरी-शाह यांच्या भूमिकेत बदलाचे संकेत.

48
0

मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना संधीची शक्यता, गडकरी-शाह यांच्या भूमिकेत बदलाचे संकेत.

नवी दिल्ली : ५ जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची चर्चा आहे. काही विद्यमान मंत्र्यांना वगळले जाण्याची, तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माध्यमांतील सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राला या विस्तारात महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रात तीन मंत्रिपदे मिळण्याची चर्चा असून खासदार श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांची नावे संभाव्य मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अधिक महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, तर अमित शाह यांना उपपंतप्रधानपद दिले जाण्याचीही चर्चा सुरू आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि अमित शाह यांच्यात अलीकडेच झालेल्या दीर्घ बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारासह आगामी उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. काही माध्यमांमध्ये राघव चड्ढा यांच्या नावाचाही संभाव्य मंत्रिपदासाठी उल्लेख करण्यात आला आहे.

मात्र, केंद्र सरकार किंवा भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्री किंवा पदोन्नतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही सर्व नावे आणि दावे सध्या केवळ माध्यमांतील सूत्रांवर आधारित असल्याचे मानले जात आहे.