Home Breaking News भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित नि: श्वास...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित नि: श्वास चंदनाचे….! हे विशेष कवी संमेलन उत्साहात संपन्न !

41
0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित नि: श्वास चंदनाचे….! हे विशेष कवी संमेलन उत्साहात संपन्न !

 पुणे: १३एप्रिल २०२६:सर्व समाजाला एक संध बांधण्याचे सामर्थ्य कवितेत असते. त्यामुळे प्रत्येक कविने कवितेला जपण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. असे प्रतिपादन एफ टी आय आयच्या कार्यक्रम निर्देशिका नीता तुपारे यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती व महाराष्ट्र राज्य ज्ञान दिना निमित्त फिल्म अँन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे अंतर्गत रेडिओ एफ टी आय आय ९०.४ एफ.एम या लोकप्रिय वाहिनीवर “नि: श्वास चंदनाचे….!”या विशेष काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

  या वेळी निता तुपारे पुढे म्हणाल्या, कवी संमेलनाच्या निमित्ताने कवीना प्रोत्साहन देवून एफ टी आय आय सांस्कृतिकता जपण्याचे काम करीत आहे. आजच्या संघर्षमय जीवनात आपण कविता हरवत चाललो आहे. अशी खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

  रेडिओ एफ टी आय आय चे प्रभारी विश्वास नेर्लेकर आणि स्टेशन मॅनेजर अनुराधा वजिरे, निर्देशिका नीता तुपारे यांच्या परवानगीने व सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

 यावेळी निता तुपारे यांनी या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण संकलन करण्याची जबाबदारी सुरळीत पार पाडली. असून लवकरच या काव्य मैफिलीचे प्रसारण करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

     आयोजित कविसंमेलन या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवी, लेखक, साहित्यिक डॉ. जयद्रथ आखाडे यांनी केले. तर बहारदार सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी, निवेदक, पत्रकार किशोर केदारी यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार अभिनेते,नाट्य, चित्रपट लेखक, दिग्दर्शक ज्येष्ठ साहित्यिक कवी अशोक वाघमारे यांनी केले.

दरम्यान ,कवी डॉ. जयद्रथ आखाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि संविधान व राष्ट्रनिर्मिती या दोन रचना सादर केल्या. तर कवी अशोक वाघमारे यांनी दरवळ चंदनाचा व भाग्यविधाता या रचना सादर केल्या.

कवी अशोक सोनवणे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानातील धम्म या रचना सादर केल्या. तर कवयित्री सुवर्णा पवार यांनी एक दिवा लावा भीमरावांच्या नावा व शिल्पकार नामक कविता सादर केल्या. उमेंद्र बीसेन यांनी उपकार भीमाचे व लढाई स्वाभिमानाची या कविता सादर केल्या. तर कवयित्री उज्वला दहिवले यांनी बा भीमा व फिटणार नाही उपकार या कविता सादर केल्या.

कवयित्री सुनिता घोडके यांनी रमा भीमाचे गुणगान व माझेबाबा या रचना सादर केल्या. तर कवी अरुण घोडके यांनी निखारा व मानाचा मुजरा या रचना सादर केल्या. कवी राजेश चौधरी यांनी जागर महामानवाचा व जागर शिक्षणाचा या कविता सादर केल्या. तर ज्येष्ठ कवी निवेदक, पत्रकार अमित उर्फ किशोर केदारी यांनी डॉ.भिमराव आंबेडकर व समानता नामक रचना आपल्या ओजस्वी व पहाडी आवाजात सादर करून मैफिलीत नवचेतना निर्माण केली.