Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘ज्योती सावित्री...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा, खानवडी’चे उदघाटन व कोनशिला अनावरण

28
0

पुणे : दि.११एप्रिल २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा, खानवडी’चे उदघाटन व कोनशिला अनावरण आणि ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जन्मशताब्दी वर्षा’चा शुभारंभ.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुलींची पहिली शाळा सुरू करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म-द्विशताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त उभारलेली ही राज्यातील पहिली पथदर्शक मॉडेल शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत सामाजिक समता व सक्षमीकरणाला चालना देणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खानवडी, ‘ शाळा ‘संकुलातील विविध सुविधांची पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण असलेल्या शैक्षणिक दालनास भेट देत विविध उपक्रमांची विद्यार्थ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

शाळेची ठळक वैशिष्ट्ये : 

✅ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समताधिष्ठित व शिक्षणप्रधान विचारांना साकार करणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम

✅ बालवाडी ते इयत्ता 12 वीपर्यंत CBSE अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, ग्रंथालय व क्रीडा सुविधा उपलब्ध

✅ सुमारे 12 एकर जागेवर उभारलेल्या या प्रकल्पासाठी 2022 मध्ये शासनाकडून जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून शाळेला आवश्यक शासकीय मान्यताही देण्यात आली आहे

✅2026-27 या शैक्षणिक वर्षापासून बालवाडी ते इयत्ता 2 रीपर्यंतचे वर्ग सुरू होत असून सध्या सुमारे 260 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे

✅ पुढील वर्षापासून इयत्ता 6 वीपासून निवासी शाळा व प्रारंभी 40 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा

✅ या प्रकल्पासाठी CSR अंतर्गत ₹21 कोटी, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद निधीतून ₹15 कोटी असा एकूण मोठा निधी उपलब्ध करून अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.