Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद’.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद’.

51
0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद’.

यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. त्यामुळे किमान 3 वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष सी-60 पदक’ देण्यात येणार आहे. 

 पोलीस यंत्रणेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत, गुन्हे अन्वेषण आणि न्यायप्रक्रियेत ‘एंड टू एंड’ डिजिटायझेशन आवश्यक आहे. तसेच विविध अन्वेषण आणि क्राईम मॉडेल्सचा समन्वय साधून संपूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टीम डिजिटल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गुन्हेगाराच्या शोधापासून पुरावे गोळा करणे, चार्जशीट दाखल करणे यांसह सर्व प्रक्रिया शंभर टक्के डिजिटल झाल्यास पुराव्यांची अचूकता आणि साखळी अधिक मजबूत होईल. नवी मुंबईत राबविण्यात आलेल्या ब्लॉकचेन-आधारित एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम सारखी प्रणाली राज्यभर लागू केल्यास पुराव्यातील छेडछाड रोखता येईल, पुढील सहा महिन्यांत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.