Home Breaking News इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी...

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

37
0

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील     – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

नवी दिल्ली, 30 : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे असे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गाझियाबाद येथील प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या कार्यशाळेला भेट दिली. इंदू मिल स्मारकासाठी तयार होत असलेल्या पुतळ्याच्या कामाची सविस्तर पाहणी केली आणि कामाच्या सद्यस्थितीचा सखोल आढावा घेतला.