पुण्यात गारासह पावसाची हजेरी , पुणेकरांना उकाड्यातून दिलासा .
३० मार्च २०२६ रोजी पुण्यात बाणेर आणि औंध भागांमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात कडाक्याचे ऊन पडत असताना सोमवारी दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि पावसाने हजेरी लावली.
मागील दोन-तीन दिवसांपासून पुण्यात तापमानात मोठी वाढ झाली होती आणि उन्हाचा कडाका जाणवू लागला होता. मात्र अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून आज आणि उद्या राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार आज काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
या अनपेक्षित पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली असून वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी या पावसाचा आनंद घेतला, तर काही भागांत पावसामुळे वाहतूक थोड्या वेळासाठी विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.