पाकिस्तानने सोमवारी रात्री पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले.
पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी राजधानी काबूलमधील एका रुग्णालयासह अनेक भागांना लक्ष्य केले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात ४०० जण ठार झाले आणि २५० हून अधिक जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दारुल अमन, अर्जन किमत, खैरखाना आणि काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास अनेक ठिकाणी स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले.तालिबान सरकारचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानी सैन्याने काबूलमधील एका व्यसनमुक्ती रुग्णालयावर बॉम्ब हल्ला केला.
तालिबानने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, याला मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हटले आहे आणि पाकिस्तानने अफगाण हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.