Home Breaking News किवळे येथील श्री. बापदेव महाराज लॉन्स येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

किवळे येथील श्री. बापदेव महाराज लॉन्स येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

107
0

किवळे: पि.ची.मनपा प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व नागरिकांच्या वतीने व किवळे ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसदस्या सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस, सौ. रेश्मा बापूजी कातळे नगर सदस्य श्री निलेश गुलाब तरस व श्री धर्मपाल यशवंत तंतरपाळे यांचा रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी सायंकाळी किवळे येथील श्री. बापदेव महाराज लॉन्स येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

   त्यानंतर नवनिर्वाचित नगर सदस्य यांचे मनोगत व चर्चा सत्र पार पडल.  त्यानंतर उपस्थितांनी आयोजित स्नेह भोजनाचा आस्वाद घेत भारत विरुद्ध न्यूझीलड या अंतिम क्रिकेट सामन्याचा एल ई डी.स्क्रीन वर थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहिले. 

    दरम्यान उपस्थित नागरिक नवनिर्वाचित नगरसदस्यांसोबत फोटो काढण्यात व त्यांच्याशी हितगुज साधण्यात दंग झाले होते.

   महा पालिके मार्फत प्रभागांतील नागरिकांसाठी सर्व अत्यावश्यक व लोकहितवादी सर्व प्रलंबित व नवोदित कामे करण्याचे नवनिर्वाचित नगर सदस्यांनी आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता झाली.