भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा; पार्थिव पटेलसोबत केली आहे ओपनिंग
न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जीत रावल याने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मूळचा गुजरातचा असलेल्या रावलने न्यूझीलंडसाठी २४ कसोटी सामने खेळले आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट याच महिन्यात भारतीय संघाचे यजमानपद भूषवणार आहे. टीम इंडिया किवी संघाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या एका खेळाडूने व्यावसायिक क्रिकेटला अलविदा केला आहे. जीत रावल असे या खेळाडूचे नाव आहे. जीटने २०१६ ते २०२० दरम्यान न्यूझीलंडसाठी २४ कसोटी सामने खेळले आहेत.
