Home Breaking News LPU मधील विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन आणि जाळपोळीवर प्रियंका चतुर्वेदींची चिंता

LPU मधील विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन आणि जाळपोळीवर प्रियंका चतुर्वेदींची चिंता

32
0

तिथे महाराष्ट्रातील मुलंही आहेत” – LPU मधील विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन आणि जाळपोळीवर प्रियंका चतुर्वेदींची चिंता

​पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) मध्ये एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या अफवेनंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले असून परिस्थिती अधिक चिघळली आहे. रविवारी उशिरा रात्री कॅम्पसमध्ये पुन्हा जाळपोळ, हिंसाचार आणि तोडफोड झाली. या सर्व घटनेवर शिवसेना (UBT) नेत्या आणि माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
​प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले की, “LPU कॅम्पसमध्ये जे काही घडत आहे ते अत्यंत अस्वस्थ करणारे आणि चिंतेचे आहे. युनिव्हर्सिटी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने, पारदर्शकपणे आणि योग्य प्रकारे लक्ष दिले पाहिजे.”