Home Breaking News नवी मुंबई बातम्या: नवी मुंबईत मोठी दुर्घटना, पारसिक हिल परिसरात टेकाड्यावरून थेट...

नवी मुंबई बातम्या: नवी मुंबईत मोठी दुर्घटना, पारसिक हिल परिसरात टेकाड्यावरून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली कार;

34
0

नवी मुंबई बातम्या: नवी मुंबईत मोठी दुर्घटना, पारसिक हिल परिसरात टेकाड्यावरून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली कार; हार्बर लाईनवरील लोकल सेवा ठप्प

नवी मुंबईतील बेलापूर येथील पारसिक हिलवर एक थरारक अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार टेकडीवरून थेट खाली रेल्वे ट्रॅकवर जाऊन कोसळली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरीकडे हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील पारसिक हिलवर एक विचित्र अपघात घडला. एक कार टेकडीवरून थेट खाली कोसळली. या घटनेत तरुण चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या अपघाताचे नेमके कारण काय, हे रेल्वे पोलिसांसह सर्वांसाठीच अजूनही गूढ बनले आहे. सुदैवाने कार खाली कोसळली त्या वेळी तेथून कोणतीही लोकल ट्रेन जात नव्हती, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेमुळे हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, प्रशासन सध्या वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे

.