Home Breaking News दौंडमधील सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी .

दौंडमधील सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी .

29
0

दौंडमधील सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी .

दौंड:पुणे ग्रामीण पोलिसांनी दौंड शहरातील सराईत गुन्हेगार रितेश भीमराव गायकवाड (वय 27, रा. भीमनगर, दौंड) याच्यावर महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था बिघडविणाऱ्या त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध गेल्या काही वर्षांत हत्येचा प्रयत्न, दरोडा, मारहाण, महिलांचा विनयभंग, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, धमकावणे आणि गंभीर दुखापत अशा स्वरूपाचे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 31 जुलै 2026 रोजी आरोपीला MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. 

आदेशाची अंमलबजावणी करत दौंड पोलिसांनी 2 ऑगस्ट 2026 रोजी आरोपीला ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले. ही कारवाई दौंड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.