Home Breaking News वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई; शेतकऱ्यांचे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २५ लाखांचा मुद्देमाल...

वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई; शेतकऱ्यांचे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

24
0

वालचंदनगर पोलिसांची मोठी कारवाई; शेतकऱ्यांचे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

इंदापूर : ४ ऑगस्ट, पुणे ग्रामीणच्या वालचंदनगर पोलिसांनी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन, मोटार पंप व इतर शेतीसाहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोरीस गेलेले ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन आणि मोटार पंप हस्तगत करण्यात आले आहेत. 

पुणे ग्रामीण जिल्ह्यात अलीकडे शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत जयदीप नानासो घोळवे (२२), मेघराज नानासो आंबोसे (२२) आणि आकाश विलास शिंदे (२३) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विविध ठिकाणांहून शेतीसाहित्य चोरी केल्याची कबुली दिली. 

या कारवाईत पोलिसांनी चोरीतील ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन, मोटार पंप आणि चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पुढील तपास सुरू आहे. जप्त केलेला मुद्देमाल संबंधित शेतकऱ्यांना परत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.