Home Breaking News पिंपरी  विधानसभा मतदारसंघात दि-३० जून २०२६ पासून ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम’...

पिंपरी  विधानसभा मतदारसंघात दि-३० जून २०२६ पासून ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम’ सुरू; ३९८ बीएलओ करणार गृहभेट.

27
0

 पिंपरी  विधानसभा मतदारसंघात दि-३० जून २०२६ पासून ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहीम’ सुरू; ३९८ बीएलओ करणार गृहभेट.

पिंपरी:१ जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, २०६ पिंपरी  विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत आणि अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक असलेले अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण आणि गणना प्रपत्र (EF) छपाई, बीएलओ यांना वाटप आदी कामकाज २९ जून पर्यंत पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. राष्ट्रीय व राज्य स्थरीय राजकीय पक्ष प्रतिनिधींची वेळोवेळी बैठक आयोजित करुन मोहिमेची माहिती देण्यात येवून व बीएलए-२ यांची प्रत्येक मतदान केंद्रावर नियुक्ती करण्याबाबत अवाहन केले आहे. या मोहीमेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे …

मोहिमेचे सविस्तर वेळापत्रकः

३० जून ते २९ जुलै २०२६: बीएलओ (BLO) मार्फत घराघरांमध्ये जाऊन ‘EF फॉर्म’ चे वाटप व स्वीकृती.

०५ ऑगस्ट २०२६ः प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी.

०५ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२६: प्रारूप यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी.

०५ ऑगस्ट ते ०३ ऑक्टोबर २०२६: दावे व हरकतींवर नोटीस बजावणी आणि सुनावणी.

०७ ऑक्टोबर २०२६ः अंतिम मतदार यादीची अधिकृत प्रसिद्धी.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील एकूण ३९८ मतदान केंद्र असून, एकूण ४,०१,९७५ (पुरुष- २,०८,६५३, स्त्री- ९,९३,२८३, इतर ३९) आहेत. दि. २९ जून २०२६ पर्यंत २,०४, २९३ (५१%) इतक्या मतदारांचे सन २००२ च्या मतदार यादीसोबत मॅपिंग/प्रोजेनी पूर्ण झाले असून यासाठी मतदारांची गृहभेट, मतदार संघातील विविध ७५ ठिकाणी शिबीर आयोजित करून, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून शोध घेऊन मॅपिंग/प्रोजेनीचे कामकाज केले आहे. उर्वरित प्रक्रिया या मोहिमेत वेगाने राबवली जाईल.

३९८ मतदान केंद्रांवर विशेष यंत्रणा तैनात-

यासाठी अतिरिक्त २३ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) नियुक्त झालेले असून, ३९८ बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) त्याच्यासह ४० नोडल अधिकारी, प्रगणक, ग्राम महसूल अधिकारी, सेक्टर अधिकारी आणि १० पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच EF वाटपसाठी स्वयंसेवी संघटना, महिला बचत गट यांची मदत घेण्यात येत आहे. महानगरपालिका व जिल्हा प्रशासनामार्फत विविध मध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात येत आहे.

श्री. जयराज देशमुख (अपर तहसिलदार, पिंपरी चिंचवड), श्री. अभिजीत केंद्रेकर (निवडणूक नायब तहसिलदार) हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) म्हणून या मोहिमेचे थेट संनियंत्रण करत आहेत.

प्रशासकीय आवाहनः

लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी मतदार यादी अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. पिंपरी मतदार संघातील सर्व सुज्ञ नागरिकांनी आपल्या कुटुंबातील पात्र मतदारांची नोंदणी व माहिती अद्ययावत असल्याची खात्री करावी आणि आपल्या घरी येणाऱ्या बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांना आवश्यक ती माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे,” असे आवाहन श्रीमती अर्चना यादव, मतदार नोंदणी अधिकारी, २०६ पिंपरी (अजा) यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईलमध्ये ECINET ऍप डाउनलोड करुन आपल्या बीएलओशी संपर्क करु शकतो, आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in, https://voters.eci.gov.in, वेबसाईटवर अधिक माहिती आहे.