Home Breaking News शिर्डीत संरक्षण क्षेत्राला मोठी चालना; राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

शिर्डीत संरक्षण क्षेत्राला मोठी चालना; राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निबे ग्रुपच्या अत्याधुनिक डिफेन्स प्रकल्पांचे उद्घाटन.

40
0

शिर्डीत संरक्षण क्षेत्राला मोठी चालना; राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निबे ग्रुपच्या अत्याधुनिक डिफेन्स प्रकल्पांचे उद्घाटन.

शिर्डी:अहिल्यानगर ,२३ मे २०२६ ,देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहआणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्ययांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे निबे ग्रुपच्या अत्याधुनिक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सला भेट देत विविध संरक्षण प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.

या दौऱ्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी निबे ग्रुपच्या आर्टिलरी शेल प्रोडक्शन लाईन, इंडिजीनस टीएनटी टेक्नोलॉजी प्लांट आणि इंडिजीनस आरडीएक्स टेक्नोलॉजी प्लांटची पाहणी केली. संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला मिळणारी चालना याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान, प्रगत संरक्षण प्रणाली, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि विविध आधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती घेतली. भारताच्या संरक्षण सज्जतेत आणि स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी अशा प्रकल्पांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. त्यामध्ये निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन आणि कोनशिला अनावरण, जीएफएल शेडचे उद्घाटन, तसेच भारतातील पहिल्या ३०० किमी क्षमतेच्या युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टम ‘सूर्यास्त्र’चे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय मिलिटरी ग्रेड टीएनटी, आरडीएक्स आणि एचएमएक्स क्षमतेचे अनावरणही करण्यात आले.

या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री उदय सामान , मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चव्हाण, तसेच निबे ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना भारत संरक्षण उत्पादन क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर भारत जगातील प्रमुख संरक्षण उत्पादक देशांमध्ये स्थान मिळवत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची संधी निर्माण होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.