Home Breaking News कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. 

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. 

51
0

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. 

 पुणे, दि. ०३ एप्रिल २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सध्याच्या मतदारांची २००२ च्या मतदार यादीशी पडताळणी (मॅपिंग) करण्यात येत आहे. तसेच मतदारांच्या तपशीलातील (नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता इ.) आवश्यक दुरुस्त्या करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.

मात्र, कामात कोणतीही प्रगती न करणाऱ्या, हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच मतदारांना प्रतिसाद न देणाऱ्या २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्र. २२८ व २३० येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांविरोधात उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कठोर पावले उचलली आहेत.

त्याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.