Home Breaking News मंचर: येथील आंबेगावातील शेतकरी खून प्रकरण उघडकीस सराईत आरोपी  व एक विधीसंघर्षित...

मंचर: येथील आंबेगावातील शेतकरी खून प्रकरण उघडकीस सराईत आरोपी  व एक विधीसंघर्षित बालक ताब्यात.

30
0

मंचर: येथील आंबेगावातील शेतकरी खून प्रकरण उघडकीस सराईत आरोपी  व एक विधीसंघर्षित बालक ताब्यात.

मंचर : मंचर येथील थोरांदळे ता. आंबेगाव येथील शेतकरी दामोदर जयराम मिंडे  (वय ६२)यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून लोखंडी पहार डोक्यात टाकून (३१ मार्च )रोजी खून करण्यात आला. सोन्याची अंगठी रोख रक्कम व मोबाईलचा २९हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मंचर पोलिसांनी समांतर तपास करून १०० सीसीटीव्ही कॅमेरे  तपासून  तसेच मोबाईलचे लोकेशन यावरून आरोपी कबीर काळे (वय २४ रा. पुणेवाडी  ता.पारनेर मुळगाव श्रीगोंदा) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे गुन्ह्यात वापरलेली पॅशन मोटरसायकल जप्त केली आहे याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली.

पुणे येथे पुणे ग्रामीण मुख्यालयात गुरुवारी (ता.९) झालेल्या पत्रकार परिषदेत संदीप सिंह गिल बोलत होते. त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाल व सहाय्य पोलीस निरीक्षक महादेव शेलार उपस्थित होते.

आरोपी काळे हा सर्व गुन्हेगार असून  याच्यावर पूर्वी पारनेर ,बेलवडी तालुका पोलीस ठाणे, आळेफाटा येथे जबरी चोरी तसेच घरफोडीचे नऊ गुन्हे दाखल आहेत. आरोपीला शनिवार (ता.११)पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीकडे चौकशी केली असता ओतूर ,घोडेगाव ,मंचर ,दिंडोरी येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. याकामी मंचर पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासाचे कौतुक गिल व चोपडे यांनी केले.