बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांन विरोधात काँग्रेसचे आकाश मोरे निवडणुकीच्या रिंगणनात.

बारामती: ५एप्रिल २०२६अखेर काँग्रेसकडून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकी साठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवाराची घोषणा केली.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्युमुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत असून, महायुतीतील भाजपा, शिंदेसेना आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असून, आकाश मोरे यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. आकाश मोरे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडूनच निवडणूक लढवली होती.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्युमुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत असून, महायुतीतील भाजपा, शिंदेसेना आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली असून, आकाश मोरे यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
आतापर्यंत बारामती विधानस मतदारसंघात १९ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. या जागेवर निवडणूक न लढवण्याची भूमिका महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धवसेना या पक्षांनी घेतली आहे. दोन्ही पक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेस निवडणुकीत उतरली आहे.
या निवडणुकी संदर्भात बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे गरज पडली तर आम्ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेऊ.