Home Breaking News पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात नाही महानगरपालिका आयुक्तांची माहिती.

पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात नाही महानगरपालिका आयुक्तांची माहिती.

22
0

पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात नाही महानगरपालिका आयुक्तांची माहिती.

पिंपरी दि: १२ एप्रिल:जलसंपदा विभागाने कमी पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५% पाणी कपातीचे निर्देश दिले असले तरी, पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) सध्या कोणतीही नवीन कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे.  असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये व पुणे शहरासाठी ३१जुलै पर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले जाते. या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाणी ३१ऑगस्ट पर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे . आणि कपातीमुळे वाचलेले पाणी नागरिकांना पुढील काही महिने वापरता येणार आहे. आणि कपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने बघता आहे त्याविषयी आयुक्त बोलले, गेल्या ६ वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

पवना व आंद्रा धरणातील समाधानकारक साठ्यामुळे सध्याचे दिवसाआड पाणीपुरवठा वेळापत्रक सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.जलसंपदा विभागाच्या सूचनेपूर्वीच  शहरात पाणी कपात सुरू आहे त्यामुळे नव्याने पाणी कपात कपात होणार नाही.