Home Breaking News  मुंबई: जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन.

 मुंबई: जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन.

84
0

 मुंबई: जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन.

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. याप्रसंगी मा. राज्यपाल यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात आला.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.