Home Breaking News Pune:राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता.

Pune:राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता.

45
0

 Pune:राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता.

महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा निसर्गाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.