Home Breaking News मुंबई:पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ घडवण्याचा संकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुंबई:पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ घडवण्याचा संकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

84
0

मुंबई:पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘पाणीदार महाराष्ट्र’ घडवण्याचा संकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे पाणी फाऊंडेशनच्या ‘पॅन-महाराष्ट्र फार्मर कप’संदर्भात बैठक पार पडली.

‘पाणी फाऊंडेशन’ने राज्य शासनासमवेत राज्याला बसणाऱ्या दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात मदत केली असून यापुढेही पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हवामानविषयक संशोधन करणाऱ्या विविध संस्थांनी यावर्षी एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्यात 80 टक्के पाऊस होईल, असे गृहीत धरून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे. 

पाण्याचे महत्त्व ओळखून पाणी फाऊंडेशन काम करत आहे. या कामासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी फाऊंडेशनला मदत करावी. त्यासाठी पूरक यंत्रणा सज्ज ठेवावी. ही संस्था राज्यात करीत असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचाही समावेश करावा. यासह फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार नियंत्रण आणि पडताळणी यंत्रणेची आवश्यकता आहे. यासाठी कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली व्यवस्था उभारण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

यावेळी पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.