Home Breaking News भारताची गॅस चिंता मिटली; 2 देश ठरणार संकटमोचक, सर्वसामान्यांना दिलासा .

भारताची गॅस चिंता मिटली; 2 देश ठरणार संकटमोचक, सर्वसामान्यांना दिलासा .

66
0

भारताची गॅस चिंता मिटली; 2 देश ठरणार संकटमोचक, सर्वसामान्यांना दिलासा .

 

 

इराण आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर पश्चिम आशियात तणाव वाढला आह .सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आक्रमक भूमिका घेत होमुर्झ सामुद्रधुनी बंद केली होती .त्याचे भारतासह जगावरही परिणाम दिसून येत आहे. भारत त्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी इतर देशांचाही पर्यायांचा विचार करत आहे. सरकारी स्रोतांच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया , कॅनडा सारख्या अनेक देशांनी भारताला अतिरिक्त गॅस पुरवठ्याची ऑफर दिली आहे.

भारताने अलिकडच्या काळात अमेरिका आणि संयुक्त अरब अमीरात (यूएई) सारख्या भागीदार देशांसोबत नवीन ऊर्जा पुरवठा व्यवस्था केली आहे. गेल्या दहा वर्षांत भारताने आपल्या तेल पुरवठ्याचे स्रोत 27 देशांपासून वाढवून 40 देशांपर्यंत वाढवले आहेत जे सहा खंडामध्ये पसरलेले आहे.

देशात तर एलपीजी पीएनजीची दरवाढही करण्यात आली आहे. पण आता कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांची भारत साठी  मदत महत्त्वाची ठरु शकते. ज्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल