Home Breaking News भंडारा- गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा भीषण अपघात.

भंडारा- गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा भीषण अपघात.

66
0

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते,  भंडारा गोंदियाचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. 

संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला (Delhi) जाण्याकरिता ते नागपूर (Nagpur) विमानतळाकडे रवाना झाले असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या दुर्घटनेत खासदार आणि त्यांचा वाहनचालक जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.मात्र त्यांच्या फॉर्च्युनर कारचा खूप नुकसान झाले आहे. पडोळे हे नागपूर – भंडारा या राष्ट्रीय महामार्गावरून परतीच्या प्रवासाला निघाले होते. यावेळी हा अपघात झाला. 

दिल्लीतील संसदेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी सोमवारी सकाळच्या सुमारास हे राजकीय नेते आपल्या खाजगी मोटारीने निघाले होते.किरकोळ दुखापतीवर प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.