Home Breaking News एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुनेत्रा अजित...

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुनेत्रा अजित पवार यांचा आवर्जून सहभाग.

59
0

बारामती:एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुनेत्रा अजित पवार आवर्जून सहभागी झाल्या आणि उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून फोरमने केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.

या प्रसंगी फोरमच्या सदस्यांकडून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या या सर्व मान्यवरांचे मनापासून अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा मिळत राहते, हा विश्वास यावेळी व्यक्त केला.

फोरमच्या माध्यमातून नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ६ हजार नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कर्करोग व्याख्यान आणि तपासणी शिबीर, पर्यावरण जनजागृतीच्या अनुषंगाने प्रतिबिंब व्याख्यानमाला, विज्ञान जत्रा, वृक्षारोपण, पाणवठे निर्मिती, मातीतील खेळ जत्रा, हॅप्पी स्ट्रीट आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आगामी काळात देखील असेच समाजोपयोगी उपक्रम फोरमच्या माध्यमातून राबविले जातील याची नक्कीच खात्री आहे.