Home Breaking News अर्थसंकल्प सादर करताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, शेतकरी कर्ज माफीची घोषना.

अर्थसंकल्प सादर करताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, शेतकरी कर्ज माफीची घोषना.

24
0

Maharashtra budget 2026.

अर्थसंकल्प सादर करताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, शेतकरी कर्ज माफीची घोषना

अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते.  राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिला मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर कर्ज माफी योजना जाहीर केली. या योजनेनुसार जे पात्र शेतकरी आहे त्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफी करण्यात आली आहे .सप्टेबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा समजला  पाहिजे.

कर्ज घेतलेले अनेक शेतकरी हे नियमित कर्ज भरत आहेत. अशा वेळी एकीकडे कर्जमाफी करताना दुसरीकडे अशा शेतकऱ्यांचा ही विचार या अर्थसंकल्पात केला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान दिले जाणार आहे.