Home Breaking News गडचांदूरमध्ये पुन्हा कचरा डंपिंगचा प्रश्न पेटला; नागरिकांनी ट्रक अडवला

गडचांदूरमध्ये पुन्हा कचरा डंपिंगचा प्रश्न पेटला; नागरिकांनी ट्रक अडवला

51
0

गडचांदूर : शहराजवळील डंपिंग यार्डमधील कचरा साठवण काही दिवसांपूर्वी बंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासातून मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा कचऱ्याने भरलेला ट्रक डंपिंग यार्डकडे येताना दिसताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

 

ट्रक येताना येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे स्थानिकांचे लक्ष त्या वाहनाकडे गेले. यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ जमाव करून संबंधित कचरा वाहतूक करणारा ट्रक अडवला. “काही दिवसांपासून दुर्गंधीची समस्या थांबली होती, मग पुन्हा कचरा का आणला जात आहे?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

नागरिकांनी या प्रकरणाबाबत माणिकगड सिमेंट वर्क्स प्रशासनाकडे थेट जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. परिसरात पुन्हा कचरा टाकला जाऊ नये, तसेच दुर्गंधीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

 

 

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.