Home Breaking News प्रभाग २५ (क) मध्ये अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी यांची दमदार एन्ट्री; राष्ट्रवादी...

प्रभाग २५ (क) मध्ये अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी यांची दमदार एन्ट्री; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक रिंगणात

80
0
 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – सर्वसाधारण ओपन महिला वॉर्ड मधून अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी जाहीर केली असून, त्यांच्या प्रवेशामुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुशिक्षित, अभ्यासू, कायद्याचे सखोल ज्ञान असलेले आणि सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, सुरुवातीपासूनच त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह घेऊन त्या मतदारांच्या दारात पोहोचत असून, “बटन घड्याळाचे – वेळ बदलण्याचे” हा विकासाचा आणि परिवर्तनाचा स्पष्ट संदेश त्या देत आहेत. प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे, हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्या सातत्याने सांगत आहेत.
प्रचारादरम्यान अॅड. राधिका कुलकर्णी यांनी महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, कामगार, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या समस्या जाणून घेतल्या असून, त्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा तयार केला आहे. पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था, नियमित स्वच्छता, दर्जेदार आरोग्य सेवा, महिलांची सुरक्षितता, मुलांसाठी शिक्षण सुविधा, खेळाची मैदाने आणि युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी – या सर्व मुद्द्यांना त्यांनी आपल्या प्रचारात केंद्रस्थानी ठेवले आहे.
“महानगरपालिकेचा विकास केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता, तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष दिसला पाहिजे. नागरिकांनी दिलेला विश्वास मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही,” असा विश्वास अॅड. राधिका कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. कायद्याचे ज्ञान आणि प्रशासनाचा अभ्यास यांच्या बळावर महापालिकेच्या सभागृहात प्रभागातील प्रत्येक प्रश्न ठामपणे मांडून न्याय मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून, तसेच सक्षम आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी प्रभाग २५ (क) मधील मतदारांनी मोठ्या मताधिक्याने राधिका कुलकर्णी यांना विजयी करावे, असे आवाहन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. सध्या प्रचाराला वेग आला असून, प्रभागात ‘घड्याळ’ चिन्हाची चर्चा घरोघरी होताना दिसत आहे.
मतदानाची माहिती :
📅 दिनांक : १५ जानेवारी २०२६
⏰ वेळ : सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.००