Home Breaking News “पंचकल्याणक णमोकार का” गीत रसिकांच्या भेटीला; णमोकार तीर्थाची आध्यात्मिक अनुभूती संगीतामधून साकार

“पंचकल्याणक णमोकार का” गीत रसिकांच्या भेटीला; णमोकार तीर्थाची आध्यात्मिक अनुभूती संगीतामधून साकार

33
0
भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून आकारास येत असलेल्या “णमोकार तीर्थ” या पवित्र तीर्थक्षेत्राच्या पंचकल्याणक महोत्सवावर आधारित “पंचकल्याणक णमोकार का” हे भक्तिगीत नुकतेच रसिकांच्या भेटीला आले आहे. गणधराचार्य राष्ट्रसंत कुंथूसागरजी गुरुदेव यांच्या आशीर्वादाने आणि जैन आचार्य परमपूज्य देवनन्दीजी गुरुदेव यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या णमोकार तीर्थाच्या आध्यात्मिक भावनेला या गीतातून सुरेल अभिव्यक्ती मिळाली आहे.
णमोकार तीर्थ पंचकल्याणक महोत्सव दि. 6 फेब्रुवारी 2026 ते 25 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत आहे.
 
या भक्तिगीता चा अधिकृत प्रकाशन सोहळा आचार्य गुरुदेव देवनन्दीजी, युगलमुनी अमोघकीर्तिजी गुरुदेव आणि अमरकीर्तिजी गुरुदेव महाराज तसेच इतर त्यागी गण व मान्यवरांच्या शुभहस्ते मोठ्या भक्तिभावात पार पडले. यावेळी उपस्थित भाविकांनी गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा मंगलमय शब्दांतून या गीतात णमोकार तीर्थ पंचकल्याणक महोत्सवाचे भक्तिरसपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. गीताचे शब्द जैन धर्मातील श्रद्धा, उत्सव, समर्पण आणि आनंद यांचे प्रभावी दर्शन घडवतात.
या गीताची शब्दरचना डॉ. ममता जैन (दुबई) यांनी केली असून संगीत आणि गायनाची जबाबदारी हर्षित अभिराज यांनी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांच्या आवाजातील भक्तिभाव आणि संगीतातील पारंपरिकतेचा सुरेख संगम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा ठरतो. या गीताची निर्मिती णमोकार तीर्थ पंचकल्याणक महोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी नमोकार तीर्थ पंचक कल्याण समितीचे संतोष पेंढारी, नीलम अजमेरा, बा. ब्र. वैशाली दीदी, कमल ठोलिया, दिनेश सेठी, पारस लोहाडे तसेच महावीर अहिंसा ट्रस्टचे अजित पाटील, शांतीनाथ पाटील, धन्यकुमार चिंचवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
“पंचकल्याणक णमोकार का” हे गीत केवळ एक भक्तिगीत नसून, जैन धर्माच्या महान परंपरेचा, पंचकल्याणक उत्सवाच्या आध्यात्मिक महत्त्वाचा आणि णमोकार तीर्थाच्या पावित्र्याचा सुरेल प्रवास आहे. हे गीत भाविकांच्या मनात भक्ती, आनंद आणि श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.